Pages

Saturday, September 18, 2010

२४ सप्टेंबर फ़क्तं स्टंट????

काल परवा पेपर मध्ये वाचलं,२४ सप्टेंबर ला राम जन्म भुमी प्रकरणाचा निर्णय होणार आहे ,आणि १७ ला समझौता बैठक.....मला लागलीच २००९ च्या लोकसभा निवड्णुकीच्या प्रचारा दरम्यान कॉंग्रेस वाल्यांनी लावलेले नारे आठवले,आणि ज्यात नागपुरात तरी,"आया राम ,गया राम- मुर्दाबाद मुर्दाबाद" असा नारा खुप गाजला होता.त्यांच्या नुसार किंवा मी जर चुकत नसेल तर अख्या देशात लोकांनी "भा ज पा" ने घेतलेला राम मंदिर मुद्दा हा नाटकी आहे अस समज करुन त्याचं हसं केलं होतं...हे सगळे विचार चक्र असे फ़िरत असतांना मनात पटकन विचार आला...की राम मंदिर हा मुद्दा बनुच कसा शकतो??आणि दुसरा विचार हा आला कि हा प्रश्नं समाजात फ़क भा ज पा, रा स्व सं,वि हि प आणि परिवार निगडित चौकटितच का सिमीत आहे?आणि मग मी ह्या द्रुष्टीनी थोडा आढावा घ्यायचा प्रयत्नं केला..
इतिहासाची पानं उलटतांना माझ्या असं लक्षात आलं की , इस्लाम ची स्थापना ही सातव्या शतकात झाली,आणि धर्माचा प्रचार करणं ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते इतकं जहाल आणि वेगाने होतं की अवघ्या पाऊण शतकात त्यांनी उत्तर चीन ते स्पेन आणि आजुबाजुचा भागावर त्यांनी साम्राज्य स्थापित केलं.पुढे इस्लाम ची चळवळ अरबांच्या हातुन तुर्कींच्या हाती गेली.आठव्या दशकाच्या सुमारास सींध वर आक्रमण झाले पण जट आणि राजपुतांनी ते आक्रमण ३५० वर्षं थांबवुन ठेवलं पण शेवटी ११ व्या शतकाच्या प्रारंभी मोहम्मद गजनी ने स्वारी केली आणि एका पठोपाठ १६ स्वा~या करुन येथील संपत्ती लुटुन नेली.१३ व्या शतकाच्या सुमारला मोहम्मद घोरीच्या आक्रमणाला प्रुथ्वीराज चव्हाणाने मोडुन काढलं पण दुस~या लढाईत त्यांचा पराभव झाला आणि पुढे १२०६ पसुन तर १५२६ पर्यंत तुर्क आणि पठाण ह्यांनी ३५० वर्षं राज्य केलं.ह्यात हिंदुंना नामशेष करण्यात,संस्कृती ,परंपरा नष्टं करण्यात यशस्वी झाले.त्यात नालंदा सारखे इत्यादी महाविद्यालये नष्टं केली.आणि पुढे मग हिंदु लोप पावायला नको म्हणुन भक्ती आंदोलन सुरु झालं
भक्ती आंदोलनांमध्ये श्रद्धास्थळं हे हिंदु जीवनशैली चे द्योतक आहे असे लक्षात आले आणि मग भगवान शिव,क्रुष्णं आणि राम ह्या आराध्य दैवतांची भक्ती सुरु झाली...भक्ती आंदोलनांमध्ये अयोध्येचं राम मंदिर प्रसिद्धं झालं आणि पुढे ते पाडण्यात आलं.मधल्या काळात अकबराने मुघल साम्राज्य च्या ऎवजी भारतीय साम्राज्य निर्माण आणी स्थापन करण्यास सुरुवात केली,ह्यला भविष्यात जहांगीर आणि शहजहांनी पाठीबा दिला पण औरंगजेबानी पुन्हा मुघल साम्राज्याचा डंका वाजवला आणि हिंदु श्रद्धास्थळे नष्टं करुन हिंदुंवर अघात करुन इस्लाम चा प्रसार केला.ह्या काळात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी मुघलां विरुद्ध खुप शक्तीशाली लढा दिला आणि हिंदुंचे रक्षण केले आणि महाराष्ट्रात वेगळाच इतिहास निर्माण केला,स्वराज्याचा इतिहास.की ज्या मुळे दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाची झोप देखिल उडाली होती.१७०७ च्या सुमारास औरंगजेब गेला आणि मराठ्यांचा काळ सुरु झाला...बाजीरावाने आपलं प्रभुत्वं निर्माण केलं.आणि मथुरा,प्रयाग,अयोध्या चं पुनः निर्माण हे उद्दिष्ट्य ठेवलं,ह्याचे कित्येक दाखले इतिहासात उपलब्धं आहे.पण पुढे पानीपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि हा काळ जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला.आणि पुढे इंग्रजांनी केलेलं आक्रमण हे बौद्धिक होतं त्यामुळे हे श्रद्धास्थळे नष्टं करण्याचा काळ इथे थोडा शांत होतांना दिसतोय.
म्हणजे काय तर राम मंदिर आणि त्याबद्दल चा लढा हा आजचा आणि अगदी स्वातंत्र्य उत्तर काळातला नसुन हा किमान ७०० वर्षांचा आहे.आणि भारतीयांचा इतिहास हा गुलामगिरीचा नसुन तर संघर्षाचा आणि परक्रमाचा देखिल आहे.
आणि तो देशातील सगळ्यांशी निगडीत आहे का??तर मी कुठेतरी ऎकलय अथवा वाचलय.की दत्तोपंत ठेंगडी १९६० च्या दशकात रशिया ला गेले होते,तिथे त्यांनी रशियातील पौराणीक लेण्यांना भेट दीली.त्यांना आढळुन आलं की तेथील शिल्पकला ही काही लेण्यां इतकी पुरातन नाही.तिथे त्यांनी विचारणा केली असता असे उत्तर मिळाले की दुसर्या महायुद्धात परकियांनी आक्रमण करतांना रशियन संस्कृतीचे प्रतिक असलेले शिल्प मोडुन काढले पण आता साम्यवादी रशियाचा नव्याने उदय होतांना देशाची अस्मिता असलेले शिल्प पुन्ह प्रस्थापित करणे हे मुख्य काम आहे आणि जगाला हे कळ्लं पहिजे की रशिया पुन्हा प्रस्थापित होतांना राष्टीय अस्मिता आम्हि राखु ठेवली आहे आणि म्हणुन आम्ही पुन्हा ही शिल्पं बनवुन घेतली...ह्याच दिशेने पुढे बघितलं तर असं लक्षात येईल की महात्मा गांधींनी पण म्हट्लं आहे की स्वातंत्र्या नंतर गुलामगिरीची निषाणे मिटवुन पुन्हा आपले अस्तित्वं प्रस्थापित केले गेले पाहिजे.
आणि कदाचित म्हणुन च स्वातंत्र्या नंतर सगळ्यात आधी डॉ.राजेंद्रप्रसाद ह्यांच्या उपस्थितित जगातील सगळ्या पवित्रं नद्यांचं पाणी आणुन भगवान शिवांची प्राण प्रतिष्ठा केली आणि त्या काळात १२१ तोफ़ांची सलामी दिली होती.पण मग राम मंदिराचा प्रश्नं मागे कसा सुटला?
पुढे लक्षात आलं की १९४९ ला पुन्हा रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि १९५० ला कोर्टात पहिली याचिका दखिल झाली ज्यात गोपालसिंग विषारद ह्यांनी मुर्तींना हलवु नये आणि शांततेत पुजा अर्चा करु द्यावी ज्यावर फ़ैजाबाद न्यायालयाने अंतरीम आदेश दिले की निर्णय येई पर्यंत हे हिंदु कडे राहिल.ज्या आधारे आजही हिंदु तिथे पुजा अर्चा करु शकतात. पुढे देवकी नंदन अगरवाल जे अलाहबाद कोर्टाचे माजी न्यायधीश होते त्यांनी याचिका दाखिल केली ज्यात म्हटलं आहे की ही जागा राम लल्ला ची जाहीर करा.कारण हिंदु धर्मा नुसार प्राण प्रतिष्ठा केल्यावर तो जिवीत असतो आणि मी रामलल्ला चा नेक्स्ट फ़्रेंड म्हणुन हा लढा लढॆन.
मधल्या काळात मुसलमानांनी अजुन एक याचिका दाखिल केली कि ही जागा कब्रस्थान घोषीत करावी आणि पुढे १९९२ ला मुस्लिम बॅक-अप् कोर्टाने म्हटलं की ६७ एकर जागा ही आम्हाला द्यावी आणि हिंदुंच्या पुजे अर्चेचं सामानही आमच्या ताब्यात द्यावं.
१९९६ ते २०१० फ़क्तं साक्षी तपासल्या,जुलै २०१० ला सुनावणी सुरु झाली आणि संपली.दरम्यान २००३ ला पुरातत्व शाखेने रीपोर्ट दिला की इथे इतिहासात रामाचं मंदिर होतं आणि आता २४ सप्टेंबरला ला निकाल येणर आहे.निर्णय झालेलाच असणार कारण तिन जज पैकी एक रीटायर होत आहेत.पण मग ही १७ तरखेला घेतलेली समझौता बैठक कशासाठी होती हे रामच जाणे.
अभ्यास करतांना एक गोष्टं लक्षात आली की इस्लाम म्हणजे दैवी शांती,आत्मीक शांती आणि पवित्रं कुराणमध्ये लिहिलं आहे की जी जागा वादाग्रस्तं आहे तिथे नमाज वाचला जाऊ शकत नाही.मग ह्या जागेवर हे मस्जिद उभारुन नमाज कसे वाचु शकतील हा एक प्रश्नं...
१९९२ ला मी केवळ ३ वर्षांची होते,मी अनुभवलं नाहिये पण समजुन नक्की घेतलय. १९९२ ते २०१० जवळपास २ पिढ्या बदलुन गेल्या.आजच्या पिढीला राम मंदिर फ़क्तं एक पोलिटिकल् स्टंट वाटतो.
पुरातत्व विभाग आणि इतिहास सांगतो की तिथे राम मंदिर होतं,जे पाडलं गेलं पण स्वातंत्र्य़ उत्तर काळात गुलाम गिरिचे चिन्ह नष्टं करण्या ऎवजी त्यावर स्वार्थी लोकांनी स्वार्थी लोकांनी वेगळा रंग दिला.श्री राम हे राष्ट्रपुरुष आहे आणि त्यांचे मंदिर बांधणे ही राष्टीय अस्मिता.
१९४७ ला देश स्वतंत्र झाला,१९४९ ला रामाची पुनः प्राण प्रतिष्ठा झाली.१९५० ला पहिली याचिका दखिल झाली.त्या नंतर जनसंघाची स्थापना,त्यांनंतर भा ज पा ची बांधणी.१९८० च्या दशकात विश्व हिंदु परिषदेची स्थापना,१९९२ ला राम लल्ला आंदोलन आणि ७०० वर्षाहुन आधिक काळ हजारो लोकांनी आपल्या ह्याच राष्ट्रीय अस्मिते साठी दिलेले बलिदान मग हा प्रश्नं फ़क्तं भा ज पा आणि परिवारासाठीच का सिमीत???
लाज वाटते का देशाच्या अस्मिते साठी लढतांना बाकी लोकांना?मित्रांनो हा पोलिटिकल स्टंट ....ऎवढीच ह्याची मर्यादा...???
जागे व्हा...विचार करा आणि मग निर्णय घ्या...देशाच्या प्रत्येक नागरिकाने,तरुणाने ह्या बद्दल विचार केला पहिजे आणि ह्या राष्टीय अस्मितेच्या प्रश्नाला जर कुणीही माई का लाल जर स्वार्था साठी मुद्दा बनवत असेल तर त्याचा तिथेच त्यांचाच भाषेत निषेध केला पहिजे....
कारण सिर्फ़ हंगामा खडा करना मक्सद नही था मेरा,
सुरत बदलनी चाहिये,
आग मेरे दिलमे ना सहि तो तुम्हारे दिलमे सही
लेकीन आग तो लगनी चाहिये......

शिवानी दाणी
ह्या देशाची एक जवाबदार तरुणी
98601-33860

वरिल माहीती साठी डॉ चंद्रशेखर फ़डनाईक(इतिहासकार),अँड्व्होकेट् पद्मा चांदे(हायकोर्ट वकील),तसेच विषयाच्या बांधणी साठी प्राजक्ता खाडिलकर(आर्टीस्ट ,ठाणे) ह्यांनी मदत केली

26 comments:

Unknown said...

WAA kay vishay ghetalay Shivani
sunder ritine tu mandlay tehi Jeshtha aani Jankar Tatdhnya Mandalichya Madatine .
Mala watat ki he wachlya war prtyek HINDU chya manat Nakki watel yethe Shri Ram Mandir Hota AANI Ram mandir yethech rahawa naki . B.J.P. CHA stunt aahe ase mhananar nahi Karan ha prashna Nusta Ram mandir kinwa B.J.P. CHA NAHI TAR HA SARWA HINDU BANDHAWANCHYA ASMITECHA AAHE . Aani B.J.P. tya sathi purnapane praytna karait aahe tyat STUNT kasa asu shakto he wachlyawar lokancha to pan BHRAM nighun janar .
!!! JAI SHRIEERAM !!!

Prasanna Ballal said...

kharach gr8 ahe tumcha vishay ani likhan tar khupach Mahiti denara ahe.
GR8 really gr8 .
!!JAI SHREE RAM!!

Unknown said...

Good article. All should realize that this is not just a stunt. People have sacrificed their lives for this noble cause. Their sacrifice and contribution to this should be respected.

Unknown said...

hi Shivani,
Mala evdhi history mahiti navati kadhi tari vachali hoti pan ata parat recall zal.
Mala kalat nahi lokana ha stunt kasa kay vatu shakato. Shri Ram mhanaje apli identity ahe. Saglya lokani ha lekh vachaylach hava, saglyana kalel ki ha vishay kiti mahatvacha ahe hindu lokansathi.
Ani je kahi BJP karty te changlach ahe.
Jai Shriram

Unknown said...

Nice article!



Ashutosh Wakhare

Tush said...

:)
chan lihila aahes
itihasatil sandarbh vaachun chaan vachal ,
baaki mi purn sahamat naahiye , pan vishayachi headline baghata " :) "

Unknown said...

Good Research Keep it up!! Keva publish honar ahe Paper madhye?

Unknown said...

आम्हाला गदा गदा हलवल्या बद्दल धन्यवाद!!!!!!!
ज्वाला तर कधीच पेटली आहे............
आता ती समर्थ पणे धगधगत ठेवू!!!!!!!!!!!!!!!!

Kaustubh Phaltankar said...

hi shivani,kharch tu lihilela prattekani vachaila hava..ya vishayakade rajkaran mhanun na baghta khara itihas ani yavar asleli kottyvadhi lokanchi astha hi prattekani samjun ghena avshyak aahe .

Unknown said...

ekdam jwalant vishay ahe ha. changla study kela ahe ani ha mudda paper madhe pathavnar ahe ka..........pls pathav.......sanglya lokana kalayla pahije......i am waiting for your this article in all news paper...........JAI SHRI RAM!

VasantAajobaa said...

सर्वात प्रथम शिवानी तुला धन्यवाद.
तुझा लेख वाचला.
माझा जन्म लाहोरला १९ जानेवारी १९४१ चा.
१९४७ ला फ़ाळनीच्या वेळेस आम्ही नागपूरला आलो. दत्तोपंत ठेंगडी हे आमच्या नात्यात आहेत.
अरे हो...आता तुझ्या लेखाबद्दल बोलायचे झाले तर ... अप्रतिम.
हा लेख वर्तमान पत्रात द्यावा.
राम मंदिर होणार आणि आपण ते बांधणार. वेळ आली तर त्यासाठी स्वतःचा जिव पण देणार.
राम मंदिराला जा्तीयवाद आणि राजकारण जोडू नये.

................... वसंताजोबा

Vasant R. Dhobley
Dhobley's Bungalow,
West Park Street No. 2,
Dhantoli, Nagpur.

Vasant R. Dhobley
13/352, JASMINE,
New MIG Colony,
Khernagar, Bandra (East),
Mumbai 400051.

PHONE: 91-22-26478542
EMAIL: vasant_dhobley@yahoo.com

Harshal D said...

Very good Shivani...

Keep it up...

Keep writing...n contributing to the society as you always do....

Tats your DNA...

I m sure, every thing which u r doing right nw will take you to excellence..

N then you will defiantly go beyond th sky...to make real mark in the Global history....

U r channelizing your energy towards right thing , at very early phase of your life...This is very unique..

Very few people were able to discover this.
Aft discovering it,u strive hard create opportunity to keep doing towards making progress on those direction... ...Towards everything which you love....

Good, keep doing...We r with you...

Kedar Kulkarni said...

It's a Good Article i must say ... Nice Research ... And Brilliantly Put .. But I still think for anything which is religious HUMAN LIFE is NOT a PRICE to be paid... Ayodhye la itihas ahe yaat shankach nahi .. Pan Khudda Ramala tari aaplya mansanche pran ghalvun kivha jiva var betel asa karya karun swataha chi karmabhumi pavitra karayachi asel ka yachi mala shanka ahe .. aapan jya samajat rahato tithe saglya prakar che lok rahatat .. Ha vishay uttam ahe .. kharokhar prerna denara ahe .. pan ha itka imp ahe ka ... ki tysathi aapan mhanto ahe ki aapan jiv hi deu ... are jevha garaj aste tevha aapn kutryala suddha wachvat nahi .. rastya varchya mansani dhakka dila and tumhala padla tar tyala shivya dyachya adhi tumhi tyla vicharta ka ki to Hindu ahe ki Muslim .. seema reshevar ladhnarya tumche javan yanna thodi shantata rakhu dya .. tynche ayusha adich khadtar ahe .. keval mandir bandhaila hava ha vishay gheun emergency anya aivaji aapan te mandir amicably kasa bandhu saku tycha vichar karuya .. karan ha vishay shevti raaajkiya toh rrjkiyach rahil ... Bandhun zalyavar amhi bandhla .. and nahi bandhla tar amhi bandhun nahi dila hyach comments yenar ahet ... sagle Hindu changle nahit ani sagle musalman vait nahit .. je ha vishay khadtat te fakta hushar ahet .. karan ultimately tyna fyaada ahe .. tymule mala asa vatta ki evdhi kalwal itar goshti baddal aasawi ..Me Hindu ahe ani tyat garwa balagto ani mhanunach konala maza dharma shreshtha ahe .. kiwa hi mazhya dharmachi jaga ahe he patwaichi mala garaj vatat nahi.. parampara, saunskruti mala japayachi ahe.. pan ti mazhya pudhchya generation la he sangun ke aamhi Hindu aahot .. aamhi hi history ahe .. pan keval samajachya bhlyasathi ami ha aatahas kela nahi .. ti jaga hindunchi ahe .. pan aata tithe koni nahi karan tithe shantata ahe .. baki koni Hindu/Muslim tithe aala ki shaaantata jail.. ani te maza hindu dharma shikwat nahi asa mala watta Shreee Ram Jai Ram Jai Jai Ram!

D shivani said...

प्रथम सर्व वाचकांच आणि हिंदु भारतिय लोकांचे आभार....क्रुपया हा विषय कसा अजुन लोकांपर्यंत पोहोचेल ह्याची काळजी करा.

प्रति केदार,

मानलं की रामाला आवडणार नाही की त्याच्या साठी ऎवढे बलिदान.मला माझा धर्म लोकांच्या भावना दुखावुन अथवा त्या चिरडुन स्वतःचे अस्तित्व बनवायला शिकवत नाही.
एका प्रश्नाचं उत्तर दे,

तुझ्या बायकोला कुठल्या भलत्याच माणसानी उद्या स्वतःची म्हटली तर????तुझ्या पोरांना तुला आई द्यायची म्हणून दुसरी आई आणशील का???

घरातल्या बाकी गोष्टी महत्वाच्या आहेत,मान्य.घरातली सुरक्षा,अन्न वस्त्र ,निवारा...
पण अस्मिता अशी दुर्लक्षीत करायची.

विचार कर...

devendra fadnavis said...

very well written. no ambiguity. keep it up.

D shivani said...

hey shivani...
good yaar...
attaparyant zalelya saglya aandolanat sahabhagi zalelya pratyakabaddal apan respect thevlach paije.....
ani navin andolakana prerit pan karaila havay....
jau dya na yaar ..aaplyala kai tyache asa vichar na karta tu jya talmaline lihila ahes tyabaddal aadhi tuze aabhar.........
keep d spirit high...
all d best
m always wid u...


Devyani Joshi


As Mrs Devyani was not having access of gmail account this was the comments i received.

Unknown said...

ho chuki hai pear parbat si pighalni chaheye, is hemalaya se koi ganga nekal ni chaheye, shirf hangama khad karna makasad nahi mera, makasad ye hai ki ye surat badalni chaheye, mere sene me na sahi tere sene me he sahi, ho kahi bhi agg magar ye agg jalni chajeye. jai shree ram .ram lala hum ayege mandir bhaveya banayege. jitendra singh thakur

Kaustubh G. said...

hindu aadhipasunach sarva samaveshak ahet...bakichya darmanvar ghav ghalun kadhich hindutva pudhe gelela nahie..pan jevha ha prashna asmite var ugarla jato ahe...tya prashnala uttar ekach ahe..."MANDIR WAHI BANAYENGE"

Its either MY WAY...or the HIGHWAY
JAI SHREERAM

A. Pradhan said...

your article on Ram Janma Bhumi. is out standing. You have chosen and presented all the details in such a way that even a ley man would start thinking about it.Very few people know these details. Best wishes and expect such informative articles in days to come.

Pradhans

Unknown said...

jithe aamchya sarkhyan che vicharshakti sampte tithe tumche vichar suru hotat... mazya sarkhe pan ya muddyavar vichar kartil ha lekh vachun... Hat's off...

kaustubh aparajit said...

Me purnapane sahmat nahi.'Ram Mandir' ha mudda keval Sangh parivaracha nasun sarva bhartiyancha ahe hya vicharashi mi purnapane sahmat ahe.

Pan 'Ram Mandir'nirmanasathi Sangh Parivartarfe 1992 nantar ekdahi pramanik ani prabhav padu shakel asa prayatna zala nahi.

Jya muddyamule BJP che 2 varun 80 MPs zale, jya muddyamule BJP che sarkar aale tya muddyacha pudhe keval rajkiy vyaspithavarun aarolya phodnyasathich vapar zala.
Hyala purava mhanje sadhe mahinabhar aadhi tari koni 'Ram Mandir' babat boltana sapadle nahi.
24 sept la nikal lagnar he kaklalyavar tyanchya (gupta) baithka suru zalya.

Nahi mhanayla BJP che sarkar asatana ekda karsevak hajaronchya sankhyene Ayodhyela pochle hote, Mandirasathi lagnare khamb vagarehi aananyat aale hote.Pan tyachehi pudhe kahi zale nahi.

Jar mandir vhayche aste tar 1992 lach zale aste, atta te shakya nahi. Karan 'Ram Mandir'sathi '92 la dhadpadnari loka ata thakli ahet ani janatelahi ata kahi apeksha nahit. Hyach post la uttar denarya lokani swatah tyanche hya muddyavar shivani cha blog wachnya aadhi kiti kami dhnyan ahe he kabul kelay.

Korana pramane, ji gair islamic Koranala aapla dharmagrnth ani Mohammad Paigambarna preshit manat nahi tyanchi prartnasthale udhdhvast karnyat yavi.Hindunchi anek mandir yavankadun lutnyat aali, fodnyat aali kinva tya vastuche ti mulat islamic ch ahe ase bimbvinyat aale. Pan hya aitihasik satyala samanyanpasun lapvun thevnayt saglyat motha vata ahe akaryksham Archiological Society of India (ASI) cha. Swatantryaantar hya sansthene 1 hi motha shodh laval nahi, shivay aaplya pouranik vastunchi sadhyachi avastha aaplyayla mahit ahech. Mhanun vadgrast jagevar ekhadya videshi ani pragat ashya sansthekadun pahni vhavi, jenekarun tethe mandir asalyacha sabal purava milel.

Jya deshat Ramjanmachi sarvjanik sutti nahi tya deshat Ramjanma zalelya sthali punha mandir nirman hoil ase mala tari watat nahi.

Unknown said...

Jabardast topic pakadla ahe yaar.
Mala itki mahiti nhawti ya baddal but seriously m thinking now.
well you keep up the good work, all the very best !!

Deepak Salunke said...

प्रति शिवानी,

तुझा लेख वाचुन निश्चितच प्रत्येक वाचणा-याच्या मनात आणि डोक्यात लख्ख प्रकाश पडावा की राममंदिर हा भा ज पा आणि संघाकरिता निर्माण झालेला केवळ राजकिय मुद्दा नाहीये. तर रामाप्रति प्रत्येक रामभक्ताची ही जबाबदारी आहे. की रामजन्मभुमीमधे राममंदिर झाले पाहिजे. हिंदुंच्या धर्म अस्मितेचा आदर राखलाच पाहिजे.

जय श्री राम.

Neha................. said...

Hey khup informative lekh ahe........

Kedar Kulkarni said...

Shivani,

Prashna Asmite Cha Ahe Asa Kharach watta Tula ...

Mazhya Baiko La Swatahachi Mhanaryachi kay dasha hoil he tar ramalach thauk ..

Pan mazhi 15vi Pidi amchya 15vya Ajobannchya Baikola Dusryachya Aajobanni Swatahacha Mhantla hota asa mhanun samja kahi karayacha prayatna karat asel tar to Badla Nasun Murkha Pana ani Muddam Aapan Kahitari vegla bollo, Kela ani aapan kiti thor he dakhawacha prayatna asel asa mala watta

1600 sali tumcha mandir padla mhanun tumhi aata tithle dusre sarva padun dusra ubha karayacha prayatna karat ahat ?

Someone has rightly said that "2 wrongs don't make 1 right"

... Dharma konacha shreshtha nahi .. sagle sarkhech ahet .. Mala mazhya dharmacha garva ahe .. Gharanyacha Garva Ahe .. Mhanun kai me pratyek manushya jo tychabaddal bolel tyala marat phiru ?

Maza vishwas mahatwacha ki dusrayacha dharma kiti shudra he dakhavne mahatwache ?

D shivani said...

प्रति केदार,

बघ राम हा माणुस नाही,राम ही संकल्पना नाही,राम हे आपल्या असण्याचं अस्तित्वाचं रुप आहे.१५ पिढ्या आधी पाडलं.१५ पिढ्या आधीची भांडणं आज करणं हा मुर्खपणा असं आजच्या पिढीला वाटतं.पण जसं मी म्हटलं राम हे अस्तित्वाचं रुप आहे.ज्याला मरण नाही,१५ पिढ्यांनी प्रयत्नं केलेत राम मंदिर बांधण्याचा...बस आता कमान आपल्या हाथी...आपण त्यांच्या १५ पिढ्यांच्या संघर्षाला हे म्हणुन सोडुन दिलं की आता काय भांडायचं तर तो अन्याय होइल मित्रा.ही अस्मितेची लढाई आहे.
आजच्या पिढिला इतिहास माहित नाही आणि कोण कष्टं करेल तो वाचण्याचे म्हणुन त्या जागेवर दवाखाना किंवा ती जागा सोडुन दुसरीकडे कुठे का बांधत नाही असा मकड प्रश्न विचारतात.शोकांतिका आहे ही.आपल्या अश्या पिढीच्या खांद्यावर भविष्याची शिदोरी दिली आहे...कसा न्याय देऊ???
स्वतःच्या बहिणीकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर प्रोबलेम पण त्या ऎवढ्याच महत्वाच्या आणि पवित्र रामाकडे कोणी डॊळॆ वर करुन बघतो तर आपण म्हणतो की adjust करु......
का???