Pages

Saturday, September 18, 2010

२४ सप्टेंबर फ़क्तं स्टंट????

काल परवा पेपर मध्ये वाचलं,२४ सप्टेंबर ला राम जन्म भुमी प्रकरणाचा निर्णय होणार आहे ,आणि १७ ला समझौता बैठक.....मला लागलीच २००९ च्या लोकसभा निवड्णुकीच्या प्रचारा दरम्यान कॉंग्रेस वाल्यांनी लावलेले नारे आठवले,आणि ज्यात नागपुरात तरी,"आया राम ,गया राम- मुर्दाबाद मुर्दाबाद" असा नारा खुप गाजला होता.त्यांच्या नुसार किंवा मी जर चुकत नसेल तर अख्या देशात लोकांनी "भा ज पा" ने घेतलेला राम मंदिर मुद्दा हा नाटकी आहे अस समज करुन त्याचं हसं केलं होतं...हे सगळे विचार चक्र असे फ़िरत असतांना मनात पटकन विचार आला...की राम मंदिर हा मुद्दा बनुच कसा शकतो??आणि दुसरा विचार हा आला कि हा प्रश्नं समाजात फ़क भा ज पा, रा स्व सं,वि हि प आणि परिवार निगडित चौकटितच का सिमीत आहे?आणि मग मी ह्या द्रुष्टीनी थोडा आढावा घ्यायचा प्रयत्नं केला..
इतिहासाची पानं उलटतांना माझ्या असं लक्षात आलं की , इस्लाम ची स्थापना ही सातव्या शतकात झाली,आणि धर्माचा प्रचार करणं ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली तेव्हा ते इतकं जहाल आणि वेगाने होतं की अवघ्या पाऊण शतकात त्यांनी उत्तर चीन ते स्पेन आणि आजुबाजुचा भागावर त्यांनी साम्राज्य स्थापित केलं.पुढे इस्लाम ची चळवळ अरबांच्या हातुन तुर्कींच्या हाती गेली.आठव्या दशकाच्या सुमारास सींध वर आक्रमण झाले पण जट आणि राजपुतांनी ते आक्रमण ३५० वर्षं थांबवुन ठेवलं पण शेवटी ११ व्या शतकाच्या प्रारंभी मोहम्मद गजनी ने स्वारी केली आणि एका पठोपाठ १६ स्वा~या करुन येथील संपत्ती लुटुन नेली.१३ व्या शतकाच्या सुमारला मोहम्मद घोरीच्या आक्रमणाला प्रुथ्वीराज चव्हाणाने मोडुन काढलं पण दुस~या लढाईत त्यांचा पराभव झाला आणि पुढे १२०६ पसुन तर १५२६ पर्यंत तुर्क आणि पठाण ह्यांनी ३५० वर्षं राज्य केलं.ह्यात हिंदुंना नामशेष करण्यात,संस्कृती ,परंपरा नष्टं करण्यात यशस्वी झाले.त्यात नालंदा सारखे इत्यादी महाविद्यालये नष्टं केली.आणि पुढे मग हिंदु लोप पावायला नको म्हणुन भक्ती आंदोलन सुरु झालं
भक्ती आंदोलनांमध्ये श्रद्धास्थळं हे हिंदु जीवनशैली चे द्योतक आहे असे लक्षात आले आणि मग भगवान शिव,क्रुष्णं आणि राम ह्या आराध्य दैवतांची भक्ती सुरु झाली...भक्ती आंदोलनांमध्ये अयोध्येचं राम मंदिर प्रसिद्धं झालं आणि पुढे ते पाडण्यात आलं.मधल्या काळात अकबराने मुघल साम्राज्य च्या ऎवजी भारतीय साम्राज्य निर्माण आणी स्थापन करण्यास सुरुवात केली,ह्यला भविष्यात जहांगीर आणि शहजहांनी पाठीबा दिला पण औरंगजेबानी पुन्हा मुघल साम्राज्याचा डंका वाजवला आणि हिंदु श्रद्धास्थळे नष्टं करुन हिंदुंवर अघात करुन इस्लाम चा प्रसार केला.ह्या काळात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी मुघलां विरुद्ध खुप शक्तीशाली लढा दिला आणि हिंदुंचे रक्षण केले आणि महाराष्ट्रात वेगळाच इतिहास निर्माण केला,स्वराज्याचा इतिहास.की ज्या मुळे दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाची झोप देखिल उडाली होती.१७०७ च्या सुमारास औरंगजेब गेला आणि मराठ्यांचा काळ सुरु झाला...बाजीरावाने आपलं प्रभुत्वं निर्माण केलं.आणि मथुरा,प्रयाग,अयोध्या चं पुनः निर्माण हे उद्दिष्ट्य ठेवलं,ह्याचे कित्येक दाखले इतिहासात उपलब्धं आहे.पण पुढे पानीपत मध्ये पेशव्यांचा पराभव झाला आणि हा काळ जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा ठरला.आणि पुढे इंग्रजांनी केलेलं आक्रमण हे बौद्धिक होतं त्यामुळे हे श्रद्धास्थळे नष्टं करण्याचा काळ इथे थोडा शांत होतांना दिसतोय.
म्हणजे काय तर राम मंदिर आणि त्याबद्दल चा लढा हा आजचा आणि अगदी स्वातंत्र्य उत्तर काळातला नसुन हा किमान ७०० वर्षांचा आहे.आणि भारतीयांचा इतिहास हा गुलामगिरीचा नसुन तर संघर्षाचा आणि परक्रमाचा देखिल आहे.
आणि तो देशातील सगळ्यांशी निगडीत आहे का??तर मी कुठेतरी ऎकलय अथवा वाचलय.की दत्तोपंत ठेंगडी १९६० च्या दशकात रशिया ला गेले होते,तिथे त्यांनी रशियातील पौराणीक लेण्यांना भेट दीली.त्यांना आढळुन आलं की तेथील शिल्पकला ही काही लेण्यां इतकी पुरातन नाही.तिथे त्यांनी विचारणा केली असता असे उत्तर मिळाले की दुसर्या महायुद्धात परकियांनी आक्रमण करतांना रशियन संस्कृतीचे प्रतिक असलेले शिल्प मोडुन काढले पण आता साम्यवादी रशियाचा नव्याने उदय होतांना देशाची अस्मिता असलेले शिल्प पुन्ह प्रस्थापित करणे हे मुख्य काम आहे आणि जगाला हे कळ्लं पहिजे की रशिया पुन्हा प्रस्थापित होतांना राष्टीय अस्मिता आम्हि राखु ठेवली आहे आणि म्हणुन आम्ही पुन्हा ही शिल्पं बनवुन घेतली...ह्याच दिशेने पुढे बघितलं तर असं लक्षात येईल की महात्मा गांधींनी पण म्हट्लं आहे की स्वातंत्र्या नंतर गुलामगिरीची निषाणे मिटवुन पुन्हा आपले अस्तित्वं प्रस्थापित केले गेले पाहिजे.
आणि कदाचित म्हणुन च स्वातंत्र्या नंतर सगळ्यात आधी डॉ.राजेंद्रप्रसाद ह्यांच्या उपस्थितित जगातील सगळ्या पवित्रं नद्यांचं पाणी आणुन भगवान शिवांची प्राण प्रतिष्ठा केली आणि त्या काळात १२१ तोफ़ांची सलामी दिली होती.पण मग राम मंदिराचा प्रश्नं मागे कसा सुटला?
पुढे लक्षात आलं की १९४९ ला पुन्हा रामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि १९५० ला कोर्टात पहिली याचिका दखिल झाली ज्यात गोपालसिंग विषारद ह्यांनी मुर्तींना हलवु नये आणि शांततेत पुजा अर्चा करु द्यावी ज्यावर फ़ैजाबाद न्यायालयाने अंतरीम आदेश दिले की निर्णय येई पर्यंत हे हिंदु कडे राहिल.ज्या आधारे आजही हिंदु तिथे पुजा अर्चा करु शकतात. पुढे देवकी नंदन अगरवाल जे अलाहबाद कोर्टाचे माजी न्यायधीश होते त्यांनी याचिका दाखिल केली ज्यात म्हटलं आहे की ही जागा राम लल्ला ची जाहीर करा.कारण हिंदु धर्मा नुसार प्राण प्रतिष्ठा केल्यावर तो जिवीत असतो आणि मी रामलल्ला चा नेक्स्ट फ़्रेंड म्हणुन हा लढा लढॆन.
मधल्या काळात मुसलमानांनी अजुन एक याचिका दाखिल केली कि ही जागा कब्रस्थान घोषीत करावी आणि पुढे १९९२ ला मुस्लिम बॅक-अप् कोर्टाने म्हटलं की ६७ एकर जागा ही आम्हाला द्यावी आणि हिंदुंच्या पुजे अर्चेचं सामानही आमच्या ताब्यात द्यावं.
१९९६ ते २०१० फ़क्तं साक्षी तपासल्या,जुलै २०१० ला सुनावणी सुरु झाली आणि संपली.दरम्यान २००३ ला पुरातत्व शाखेने रीपोर्ट दिला की इथे इतिहासात रामाचं मंदिर होतं आणि आता २४ सप्टेंबरला ला निकाल येणर आहे.निर्णय झालेलाच असणार कारण तिन जज पैकी एक रीटायर होत आहेत.पण मग ही १७ तरखेला घेतलेली समझौता बैठक कशासाठी होती हे रामच जाणे.
अभ्यास करतांना एक गोष्टं लक्षात आली की इस्लाम म्हणजे दैवी शांती,आत्मीक शांती आणि पवित्रं कुराणमध्ये लिहिलं आहे की जी जागा वादाग्रस्तं आहे तिथे नमाज वाचला जाऊ शकत नाही.मग ह्या जागेवर हे मस्जिद उभारुन नमाज कसे वाचु शकतील हा एक प्रश्नं...
१९९२ ला मी केवळ ३ वर्षांची होते,मी अनुभवलं नाहिये पण समजुन नक्की घेतलय. १९९२ ते २०१० जवळपास २ पिढ्या बदलुन गेल्या.आजच्या पिढीला राम मंदिर फ़क्तं एक पोलिटिकल् स्टंट वाटतो.
पुरातत्व विभाग आणि इतिहास सांगतो की तिथे राम मंदिर होतं,जे पाडलं गेलं पण स्वातंत्र्य़ उत्तर काळात गुलाम गिरिचे चिन्ह नष्टं करण्या ऎवजी त्यावर स्वार्थी लोकांनी स्वार्थी लोकांनी वेगळा रंग दिला.श्री राम हे राष्ट्रपुरुष आहे आणि त्यांचे मंदिर बांधणे ही राष्टीय अस्मिता.
१९४७ ला देश स्वतंत्र झाला,१९४९ ला रामाची पुनः प्राण प्रतिष्ठा झाली.१९५० ला पहिली याचिका दखिल झाली.त्या नंतर जनसंघाची स्थापना,त्यांनंतर भा ज पा ची बांधणी.१९८० च्या दशकात विश्व हिंदु परिषदेची स्थापना,१९९२ ला राम लल्ला आंदोलन आणि ७०० वर्षाहुन आधिक काळ हजारो लोकांनी आपल्या ह्याच राष्ट्रीय अस्मिते साठी दिलेले बलिदान मग हा प्रश्नं फ़क्तं भा ज पा आणि परिवारासाठीच का सिमीत???
लाज वाटते का देशाच्या अस्मिते साठी लढतांना बाकी लोकांना?मित्रांनो हा पोलिटिकल स्टंट ....ऎवढीच ह्याची मर्यादा...???
जागे व्हा...विचार करा आणि मग निर्णय घ्या...देशाच्या प्रत्येक नागरिकाने,तरुणाने ह्या बद्दल विचार केला पहिजे आणि ह्या राष्टीय अस्मितेच्या प्रश्नाला जर कुणीही माई का लाल जर स्वार्था साठी मुद्दा बनवत असेल तर त्याचा तिथेच त्यांचाच भाषेत निषेध केला पहिजे....
कारण सिर्फ़ हंगामा खडा करना मक्सद नही था मेरा,
सुरत बदलनी चाहिये,
आग मेरे दिलमे ना सहि तो तुम्हारे दिलमे सही
लेकीन आग तो लगनी चाहिये......

शिवानी दाणी
ह्या देशाची एक जवाबदार तरुणी
98601-33860

वरिल माहीती साठी डॉ चंद्रशेखर फ़डनाईक(इतिहासकार),अँड्व्होकेट् पद्मा चांदे(हायकोर्ट वकील),तसेच विषयाच्या बांधणी साठी प्राजक्ता खाडिलकर(आर्टीस्ट ,ठाणे) ह्यांनी मदत केली